शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकप विजेत्यांचे कुस्तीपटूंना समर्थन, १९८३ चा क्रिकेट संघ पुन्हा मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 06:10 IST

 पदकांचा विसर्जनाचा विचार चिंताजनक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ती अशोभनीय दृश्ये पाहून व्यथित झाल्याचे १९८३ च्या क्रिकेट विश्वविजेत्या क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी करून त्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा व्यक्त केला.

मेहनतीने मिळविलेली पदके कुस्तीपटू गंगा नदीत टाकण्याचा विचार करीत आहेत, याची आम्हाला चिंता आहे. त्या पदकांमध्ये अनेक वर्षांचे प्रयत्न, त्याग, दृढनिश्चय आणि धैर्य यांचा समावेश आहे. त्यात देशाचा अभिमान आणि आनंद आहे. आम्ही त्यांना कोणताही घाईघाईने निर्णय न घेण्याचे आवाहन करतो. देशातील कायदा विजयी ठरू द्या, असे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या संघाने निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, कुस्तीपटूंना न्याय मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे; परंतु हे सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतरच शक्य होईल, अशी भूमिका केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी मांडली. 

खाप महापंचायतीचा आंदोलनाचा इशारा खाप महापंचायतीने शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनाला बसण्याचा इशाराही दिला आहे. कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाशी संबंधित आंदोलनात पुढील पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यासाठी येथे बैठक झाली. 

ब्रिजभूषणकडून अनेकदा विनयभंग झाल्याची तक्रारदिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत, त्यात प्रथम अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपांच्या आधारे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. ‘ब्रिजभूषण यांनी अनेकदा विनयभंग केला. श्वास तपासण्याच्या बहाण्याने टी-शर्टही काढायला लावला. ब्रिजभूषण यांनी शारीरिक संबंधाची मागणी केली होती. २०१९ मध्ये माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला,’ असे अनेक आरोप अल्पवयीन कुस्तीपटूने केले आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली