अशोका शाळेत गुवणत्ता सुधार योजनेअंतर्गत कार्यशाळा
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
नाशिक : एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दोनदिवसीय गुणवत्ता योजनेंतर्गत कार्यशाळेस प्रारंभ झाला. कार्यशाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना पूर्णवेळ प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयएसओ ९००१ या मानांकाप्रमाणे सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता टिकवण्याचे धडे दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने नियोजन, दस्तऐवज, पायाभूत सुविधा, कामाचे पृथक्करण व विश्लेषण करणे होय. विद्यापीठ मानांकाप्रमाणे प्रत्येक संस्थेला आयएसओ नामांकन घेणे गरजेचे आहे. विकासामध्ये पुढचे पाऊल म्हणून अशोका एज्युकेशन फाउंडेशन स्वईच्छेने आंतरराष्ट्रीय नामांकन घेण्याचे प्रबळ इच्छा दर्शविली. या कार्यशाळामध्ये सर्वांना आंतरराष्ट्रीय पातळीचे ज्ञान दिले जाते व नियोजन आणि व्यवस्थापन यांची सांगड घालून उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा विकास केला जातो.