शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केंद्र सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, दिल्लीला तीन दिवसीय धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:30 IST

किमान वेतनासह विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी कामगारांच्या सर्व केंद्रीय संघटनांनी ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : किमान वेतनासह विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी कामगारांच्या सर्व केंद्रीय संघटनांनी ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (आरएमएमएस) कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. त्यात केंद्र सरकारविरोधात पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सर्व कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.केंद्रीय इंटकचे संघटन चिटणीस व आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत बँक कर्मचारी संघटनेचे नेते विश्वासउटगी, आयटकचे नेते सुकुमारदामले, हिंद मजूर सभेचे संजय वढावकर, सीटूचे नेते पी.एम. वर्तक, इंटकचे राज्य उपाध्यक्ष अनिल गणाचार्य आदी नेते उपस्थित होते.या बैठकीत दिल्लीला होणारे आंदोलन लक्षवेधी ठरण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसण्याचा निर्णय घेतला.केंद्रीय आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय श्रमिक संघटनेने ७ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता परळच्या महात्मा गांधी सभागृहात राज्यव्यापी परिषद बोलावली आहे. या परिषदेला केंद्रीय श्रमिक संघटनेच्या कृती समितीचे प्रमुख आणि इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी मार्गदर्शन करतील. त्याआधी इंटकच्या राज्य कार्यकारिणीची बैठक ७ आॅक्टोबरलाच फोर्टच्या के.आर. कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडेल.कमीतकमी १८ हजार रुपये किमान वेतन लागू करा.सर्व कामगारांना किमान ३ हजार रुपये पेन्शन लागू करा.सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा.बोनस आणि भविष्य निर्वाह निधी पात्रतेसाठीची जाचक अट दूर करून सर्व कामगारांना या योजनेचा लाभ द्या.कामगार कायदे सशक्तपणे लागू करा.बेरोजगारी नष्ट करून बेकार सुशिक्षितांना काम द्या.

टॅग्स :Governmentसरकार