शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारतात ओमायक्रॉनच्या धास्तीनं ‘वर्क फ्राॅम होम’ सुरूच राहण्याची दाट शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 05:04 IST

२०१९मध्ये कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीचा उदय झाला. आयटी क्षेत्रात ही कार्यसंस्कृती जोमात वाढली आणि रुजलीही

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावण्याच्या कंपन्यांच्या योजनांना कोविड-१९ विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जबर धक्का दिला असून, ‘वर्क फ्रॉम होम’ यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

२०१९मध्ये कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीचा उदय झाला. आयटी क्षेत्रात ही कार्यसंस्कृती जोमात वाढली आणि रुजलीही. भारतात दुसऱ्या लाटेनंतर साथ ओसरली. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कार्यालयांत बोलावण्याच्या योजना आखल्या. तथापि, अचानक उद्भवलेल्या ओमायक्रॉनमुळे आता या योजनांना खीळ बसली आहे. जगात अन्यत्रही हीच स्थिती आहे.

सूत्रांनी सांगितले की, ओमायक्रॉन विषाणूचा कंपन्यांचे कामकाज आणि नफा यावर काय परिणाम होईल, याबाबत आत्ताच काहीच ठरवता येत नसल्यामुळे बहुतांश कंपन्यांनी ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका स्वीकारली आहे. 

योजना लांबणीवर... ‘गुगल’ची पालक कंपनी अल्फाबेट आयएनसीने कार्यालयांत परतण्याच्या आपल्या योजनेला बेमुदत काळासाठी लांबणीवर टाकले आहे. लक्झरी टाॅयलेट उत्पादक कंपनी लिक्सिल कॉर्प्सचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जीन मोन्टेसॅनो यांनी सांगितले की, बदललेल्या परिस्थितीत कार्यालय म्हणजे काय, याची व्याख्याच आम्ही बदलवत आहोत. फिलिप माॅरीसचे सीईओ जॅक ओलक्झॅक यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीची तुलना केवळ युद्धकालीन स्थितीशीच होऊ शकते. आयन पीएलसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नील मिल्स यांनी सांगितले की, जानेवारीत कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले तर  ते किती जोखमीचे ठरेल, याचा विचार करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन