शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम अन् मूनलाईटनिंग! ही तर कंपन्यांसोबत दगाबाजीच; विप्रोचे चेअरमन भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 09:18 IST

टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झाले आहे. आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यामुळे ऑफिसला जाण्याच्या तयारीचा, यायचा-जायचा वेळ वाचत आहे. या फावल्या वेळात हे कर्मचारी दुसरीकडे कुठे काम करता येते का हे पाहत आहेत. आयटी क्षेत्रात या दुसऱ्या नोकरीची चर्चा रंगली आहे. असे असताना विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांनी हा कंपन्यांसोबत धोका आहे, असे सुनावले आहे. 

टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. यावर प्रेमजी यांनी ही धोकेबाजी असल्याचे म्हटले आहे. ''टेक इंडस्ट्रीमध्ये लोक त्यांच्या कंपनीच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी करतात याबद्दल बरीच चर्चा आहे. स्पष्टपणे ही फसवणूक आहे.'' असे ते म्हणाले.  विप्रो चेअरमनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा कंपनीने भूतकाळातील मार्जिनवरील वाढत्या दबावामुळे कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे रोखण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी एक्झिक्युटिव्ह (सी-सूट) लेव्हल मॅनेजर्सना व्हेरिएबल पेचा कोणताही भाग मिळणार नाही, तर नवीन कर्मचाऱ्यांच्या टीम लीडर्सना एकूण व्हेरिएबल वेतनाच्या 70 टक्के रक्कम मिळेल.

अलीकडेच फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने 'मूनलाइटनिंग' पॉलिसी सुरू केली आहे. याअंतर्गत कंपनीच्या मंजुरीनंतर कर्मचारी इतर कामेही करू शकतात. स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन प्रेमजींच्या मताशी असहमत असल्याचे दिसून आले. 'कार्यक्षेत्रातील हे भविष्य आहे. तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असून क्रूर नाही' असे ते म्हणाले. 

टॅग्स :Wiproविप्रो