शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

आठ नगरपालिकांच्या ४२ हरकतींवर कामकाज १९ तक्रारदार गैरजर : लेखी व तोंडी पुरावे घेतले

By admin | Updated: July 18, 2016 23:31 IST

जळगाव : जिल्‘ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले.

जळगाव : जिल्‘ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले.
डिसेंबर २०१६ अखेर मुदत संपत असलेल्या १२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या नगरपालिका क्षेत्रातील ३६८ नागरिकांनी वॉर्ड रचनेसंदर्भात हरकती दाखल केल्या आहेत. सोमवारी पारोळा, रावेर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, अमळनेर, यावल, फैजपूर या आठ नगरपालिका क्षेत्रातील ४२ हरकतींवर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुनावणी झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी दोन वाजेपर्यंत चालली. यात १९ हरकतदार गैरहजर होते. प्रत्यक्षात २३ हरकतदारांचे लेखी व तोंडी स्वरुपात म्हणणे ऐकून घेण्यात आले. यासोबत त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर हरकती गुणवत्तेवर आयुक्तांनी शिफारास करावी यासाठी बंद करण्यात आल्या. जिल्हाधिकारी याबाबतचा एकत्रित अहवाल हा २७ जुलै पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर हरकतदाराचे म्हणणे, मुख्याधिकार्‍यांचा अभिप्राय तसेच जिल्हाधिकार्‍यांचे निष्कर्ष या आधारावर विभागीय आयुक्त त्याबाबत निर्णय घेणार आहेत.
मंगळवारी चाळीसगाव तर गुरुवार २१ रोजी भुसावळ नगरपालिका क्षेत्रातून आलेल्या हरकतींवर कामकाज होणार आहे.