घरकुलांचे काम सुरू होणार मनपा : दोन दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही
By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST
जळगाव : केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले घरकूल योजनेचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद होते. हे काम आता येत्या दोन,तीन दिवसात पुन्हा सुरू होणार आहे. या संदर्भात बुधवारी मनपात बैठक झाली.
घरकुलांचे काम सुरू होणार मनपा : दोन दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही
जळगाव : केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले घरकूल योजनेचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद होते. हे काम आता येत्या दोन,तीन दिवसात पुन्हा सुरू होणार आहे. या संदर्भात बुधवारी मनपात बैठक झाली. शासनाच्या आयएचएफडीसी (एकात्मिक झोपडपी निर्मूलन कार्यक्रम) योजनेंतर्गत मनपास १० कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला होता. या अतर्गत ४०२ घरकुले बांधणे प्रस्तावित आहेत. मनपाने यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली होती. यासाठी औरंगाबाद येथील निर्माण गोल्ड या संस्थेस कामाचा मक्ता देण्यात आला होता. या कामास सुरुवातही झाली. ४०२ पैकी २६० घरांचे काम जवळपास पूर्ण झाले असून २१२ घरकुलांचे काम सुरू करावयाचे आहे. या कामासंदर्भात शासनाकडे सुधारित आराखडा तयार करून सादर करण्यात आला होता. तो मंजूर होणे बाकी होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र मक्तेदाराकडून हे काम सुरू करण्यास विलंब लावला जात होता. याची दखल घेऊन आयुक्तांनी निर्माण गोल्डच्या प्रतिनिधीस बुधवारी मनपात बोलावले होते. त्यांच्या सोबत सायंकाळी बैठक झाली. त्यानुसार या मक्तेदाराने काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात घरकुलांच्या या कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.