शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्ला नाराज? वारंवार अवमान होत असल्याने दुखावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:33 IST

संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होईपर्यंत व त्यांनी संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करेपर्यंत लोकसभेत आपल्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांच्या खुर्चीचा वारंवार अवमान होत असल्यामुळे ते दुखावले आहेत.

संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला. विरोधक वारंवार गदारोळ करीत असल्यामुळे व लोकसभेच्या कामकाजात अडथळा येत असल्यामुळे आपण दुखावलो आहोत. जोपर्यंत खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही आणि ते संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करीत नाहीत, तोपर्यंत आपण लोकसभेत जाणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी ओम बिर्ला यांची नाराजी योग्य ठरवत सरकारमधील मंत्र्यांना त्यांची नाराजी दूर करण्याचे निर्देश दिले.

का उचलले पाऊल? मंगळवारी दिल्ली सेवा संबंधी विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले व वेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. ओम बिर्ला यांनी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. असे वागणे योग्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी योग्य संधी देणार आहे, असेही बिर्ला सांगत होते. परंतु, विरोधी खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

तुमचे हे वागणे संपूर्ण देश पाहत आहे. अशा प्रकारचे वर्तन सभागृहात योग्य नाही, असेही बिर्ला म्हणत होते. परंतु, विरोधी खासदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. अखेर आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागद फेकल्यामुळे दुखावलेल्या ओम बिर्ला यांनी हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाParliamentसंसद