महिला दिन--मोहनन
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
र्शम संस्कृतीवर भर
महिला दिन--मोहनन
र्शम संस्कृतीवर भरनीला मोहनन या तरुण आयएएस अधिकारी गोव्याच्या प्रशासनात जिल्हाधिकारी म्हणून आल्या आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आपल्या कामाचा लवकरच ठसा उमटविला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील अतिशय जलदगतीने लोकांची कायदेशीर कामे होऊ शकतात हे मोहनन यांनी दाखवून दिले. आता विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरदेखील मोहनन यांच्या कामाची प्रशंसा करतात. महसूल खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनादेखील मोहनन यांच्या कामाची पद्धत कळाली व आवडली. अगोदर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयास मानवी चेहरा नव्हता. मिहिर वर्धन जिल्हाधिकारी म्हणून काम पाहायचे. त्यांना भेटायला जाणार्या माणसाशी ते नीट बोलतही नव्हते. समोरील माणसाचा चेहरादेखील न पाहता केवळ नकारात्मक उत्तरे ते द्यायचे. नीला मोहनन यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला आणि आता सामान्यांना जिल्हाधिकार्यांशी बोलण्याची संधी मिळत आहे. मोहनन ?ा प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतात. अगदी शनिवारीदेखील त्या कामात मग्न असतात. मध्यंतरी त्यांनी विविध मामलेदार, उपजिल्हाधिकारी वगैरे कार्यालयांना भेटी देऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. लो प्रोफाईल अशा ?ा अधिकारी. त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या वाट्याला आलेल्या कामात असते. मूळ केरळमधील मोहनन यांचे अमेय अभ्यंकर या पुणे येथील आयएएस अधिकार्याशी लग्न झाले. अभ्यंकर हे गोवा पर्यटन खात्याचे संचालक आहेत. मोहनन यांना संगीत व अन्य क्षेत्रांत आवड आहे. गोमंतकीयांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळायला हव्यात, त्यांना वारंवार मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयात खेपा माराव्या लागू नयेत, असे आपल्याला वाटते व त्यामुळेच माहिती तंत्रज्ञानाचा व संगणकीकृत प्रशासनाचा अधिकाधिक वापर आम्ही सुरू केला असल्याचे मोहनन यांनी सांगितले.- सद्गुरू पाटील