शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना प.बंगालमध्ये पाठवा 15 दिवसांत बलात्कार होईल - भाजपा नेत्या

By admin | Updated: July 14, 2017 18:53 IST

प. बंगाल येथील भाजपाच्या नेत्या रुपा गांगुली यांनी महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 14 - प. बंगाल येथील भाजपाच्या नेत्या रुपा गांगुली यांनी महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करणाऱ्यांनी आपल्या घरातील स्त्रीला पं. बंगालमध्ये पाठवायला हवे. रुपा गांगुलीने असा दावा केला आहे की, पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्याशिवाय येणाऱ्या महिलांवर 15 दिवसांच्या आत बलात्कार होईल. रूपा गांगुली माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, जे व्यक्ती ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करतात त्यांनी मुलगी, बहीण, सून किंवा बायकोला पं. बंगालमध्ये पाठवून पहायला पाहिजे, त्यांच्यावर 15 दिवसांत बलात्कार न झाल्यास मला सांगा. रुपा गांगुलीनं केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या अडचणात येण्याची शक्यता आहे. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गांगुली यांच्या वक्तव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या आठवड्यात पं. बांगालमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी रुपा गांगुली प्रकाशझोतात आल्या होत्या. फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याचप्रकरणावर रुपा गांगुली यांच्या एका समर्थकाने फेसबुक आपत्तीजनक पोस्ट करत त्यांना टॅग केलं होतं. यावर गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. सध्या पं. बंगालमधील तणावसदृश्य परिस्थिती निवळायला सुरूवात झाली आहे. फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी सकाळपासून दुकानं, बाजार आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. लोकांनी घराच्या बाहेर पडायला सुरूवात केली असून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडलेली नाही.