शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा होणार सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 03:36 IST

विविध क्षेत्रांत विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांत या महिलांनी विक्रम केला आहे.राज्यातील १५ महिलांमध्ये पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सातारा येथील सुरेखा यादव, बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे, अग्निशमन अधिकारी हर्षिनी कण्हेकर, आॅटोरिक्षाचालक शीला डावरे, आमदार डॉ.भारती लव्हेकर, चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ अरुणा राजे पाटील, भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी, कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाºया स्नेहा कामत, गुप्तहेर रजनी पंडित, असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आॅफ इंडियाच्या अध्यक्ष स्वाती परिमल, अंधांसाठी मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाºया उपासना मकाती, टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाºया स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा, डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी कलाकार १८ वर्षीय तारा आनंद यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका महाराष्ट्र कन्या दुगार्बाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्री पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.