स्त्रियांनी स्वत: ला सबला समजावे उपक्रम : चंद्रकला चाटे यांचे आवाहन
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
वडवळ नागनाथ : आईच आपल्या मुलांना घडवू शकते़ त्याचबरोबर समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे़ त्यामुळे महिलांनी स्वत:ला सबला समजून राष्ट्र उन्नतीच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन चंद्रकला चाटे यांनी गुरुवारी येथे केले़
स्त्रियांनी स्वत: ला सबला समजावे उपक्रम : चंद्रकला चाटे यांचे आवाहन
वडवळ नागनाथ : आईच आपल्या मुलांना घडवू शकते़ त्याचबरोबर समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे़ त्यामुळे महिलांनी स्वत:ला सबला समजून राष्ट्र उन्नतीच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन चंद्रकला चाटे यांनी गुरुवारी येथे केले़वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत लेक शिकवा उपक्रमात त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी अरूणा पाटील होत्या़ यावेळी मीरा कसबे, अनिता लोखंडे, आशादेवी ठाकूर, मायाताई सोरटे, पारूबाई राठोड, राऊत आदी उपस्थित होते़ याप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थ्यांनी वर्षा रेकुळगे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन स्वाती चिदे्रवार यांनी केले़ आभार महानंदा धुळशेे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामकिशन माळी, प्रमोद वाघमारे, शिवदत्त पांचाळ, शिवकुमार मोरगे, रणजित घुमे व नभा साळूंके यांनी परिश्रम घेतले़