कार-ट्रेलरच्या अपघातात महिला ठार
By admin | Updated: February 19, 2016 00:24 IST
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव ते मुक्ताईनगर दरम्यान बुधवारी मध्यरात्री कार व ट्रेलरचा अपघात होऊन मुंबई बारी समाजाच्या माजी अध्यक्षा प्रतिभा रामराव केदार (४५, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद, ह.मु. मुंबई) या ठार झाल्या तर त्यांचे पती, पुतणी व कारचालक जखमी झाले आहे. मयत महिलेवर जळगाव येथेच संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कार-ट्रेलरच्या अपघातात महिला ठार
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव ते मुक्ताईनगर दरम्यान बुधवारी मध्यरात्री कार व ट्रेलरचा अपघात होऊन मुंबई बारी समाजाच्या माजी अध्यक्षा प्रतिभा रामराव केदार (४५, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद, ह.मु. मुंबई) या ठार झाल्या तर त्यांचे पती, पुतणी व कारचालक जखमी झाले आहे. मयत महिलेवर जळगाव येथेच संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनगाव, ता. जळगाव जामोद येथील रहिवासी व मुंबई उच्च न्यायालयातील वकील रामराव सोनाजी केदार (५५) हे त्यांच्या पत्नी प्रतिभा केदार, पुतणी वर्षा श्रीराम केदार यांच्यासह मुंबई येथून कारने गावी जात होते. बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कार वरणगाव ते मुक्ताईनगर दरम्यान असताना समोरुन येणार्या ट्रेलरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात प्रतिभा केदार या ठार झाल्या तर त्यांचे पती रामराव केदार, पुतणी वर्षा व चालक जखमी झाले. जखमींना जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मयत महिलेचे जिल्हा रुग्णालयालयात शवविच्छेदन करुन जळगावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.