शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

महिलाही ‘फायटर’

By admin | Updated: October 25, 2015 04:31 IST

दुर्दम्य आत्मविश्वास आणि धाडसाच्या बळावर एक-एक शिखर यशस्वीपणे पादाक्रांत करणाऱ्या महिलांसाठी आता आकाश आणखी ठेंगणे झाले आहे. केंद्र सरकारने

नवी दिल्ली : दुर्दम्य आत्मविश्वास आणि धाडसाच्या बळावर एक-एक शिखर यशस्वीपणे पादाक्रांत करणाऱ्या महिलांसाठी आता आकाश आणखी ठेंगणे झाले आहे. केंद्र सरकारने भारतीय वायुसेनेत महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून काम करू देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच महिला देशाच्या सशस्त्र दलात लढाऊ विमानांच्या वैमानिकाच्या भूमिकेत दृष्टीस पडतील.एअर फोर्स अकादमीतून यंदा उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीतून महिला फायटर पायलटची निवड करण्यात येईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली. प्रारंभिक प्रशिक्षणानंतर जून २०१६मध्ये त्यांना वायुसेनेच्या लढाऊ दलात कमिशन देण्यात येईल आणि एक वर्षाच्या सखोल प्रशिक्षणानंतर जून २०१७पर्यंत हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे सारथ्य महिलांच्या हाती येईल. कामगिरी प्रशंसनीयभारतीय महिलांच्या आकांक्षा आणि विकसित देशांमधील सशस्त्र दलांची प्रचलित व्यवस्था लक्षात घेऊन हे प्रगतशील पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेच्या परिवहन आणि हेलिकॉप्टर बेड्यातील महिलांची कामगिरी प्रशंसनीय असून, त्या खऱ्या अर्थाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे संरक्षण विभागाने हा निर्णय जाहीर करताना नमूद केले आहे.वायुदलप्रमुख एअर चिफ मार्शल अरूप राहा यांनी गेल्या महिन्यात वायुसेनादिनी वायुसेना महिला वैमानिकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणांची परवानगी देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीसुद्धा या योजनेला दुजोरा देत लवकरच निर्णय होणार असल्याची ग्वाही दिली होती. वायुसेनेत आतापर्यंत लढाऊ दल वगळता इतर सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत होती. परंतु या निर्णयामुळे वायुसेनेच्या सर्व शाखांची दारे महिलांसाठी खुली झाली आहेत.1992 पासून भारतीय वायुसेनेत महिलांचा समावेश झाला.110 महिला पायलट सध्या वायुसेनेत आहेत; मात्र त्यांच्यावर लढाऊ विमानांची जबाबदारी देण्यात आली नव्हती.1300 महिला अधिकारी वायुसेनेत कार्यरत आहेत.2013 साली पाकिस्तानात २६वर्षीय आयशा फारूक लढाऊ विमानाची पहिली महिला वैमानिक बनली होती.