शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; भाविकांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:44 IST

तिरुवनंतपुरम : शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात शुक्रवारीही प्रवेश मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना, मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने महिलांनी प्रवेशाचा ...

तिरुवनंतपुरम : शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात शुक्रवारीही प्रवेश मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना, मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ , अशी धमकीच दिली.

एक महिला पत्रकार व तिची एक सहकारी अशा दोघी जणी आज सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत सुमारे २५0 पोलीस संरक्षण होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर हेल्मेट आणि अंगात बुलेटप्रुफ जॅकेट होते. पोलिसांनीच त्यांना ते घालण्यास सांगितले होते. त्यांच्यासह पोलीस मंदिरापर्यंत पोहोचले, तेव्हा भाविकांनी त्यांचा रस्ताच रोखून धरला. पोलीसही त्या भाविकांना हटवू शकले नाहीत. त्याच वेळी महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ अशी धमकी दिली. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला.

आम्ही मंदिराच्या दरवाजापर्यंत महिलांना संरक्षण देऊ शकतो. त्यांना मंदिराच्या आत नेणे आमचे काम नाही, असे पोलिसांनीही स्पष्ट केले. अशा स्थितीत तिथूनच मागे फिरण्याचा निर्णय दोघा महिलांनी घेतला. त्या दोघींनी बाहेर आल्यावर पोलिसांचे तसेच प्रसार माध्यमांचे आभार मानले.पुनर्विचार याचिका करणारमंदिरात सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय मंदिराच्या प्रशासनाने आज संध्याकाळी घेतला. त्याचा निकाल लागेपर्यंत महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही आणि पोलीस संरक्षणात त्यांनी येण्याचा प्रयत्न केल्यास मंदिराचे मुख्य दरवाजे बंद करून निघून जायचे, असे मुख्य पुजारी के. राजीवरू यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिर