शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

...तर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे; गुजरातमधल्या काँग्रेसच्या महिला आमदाराचा उद्वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 15:53 IST

गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे.

अहमदाबाद- गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकमेकांवर चिखलफेक केली आहे. आता गुजरातमधल्या काँग्रेसच्या आमदार गेनिबेन ठाकोर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्कार करणा-या आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा जिवंत जाळलं पाहिजे.या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता ठाकोर यांनी या विधानावर सारवासारवीची भूमिका घेतली आहे. महिलांना शांत करण्यासाठी मी असं विधान केलं होतं, असंही त्या महिला आमदार म्हणाल्या आहेत. ठाकोर या बनासकांठा जिल्ह्यातील वाव भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्या वादग्रस्त विधान करत असल्याचा व्हिडीओ मोबाईलवरून बनवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्या महिलांच्या मध्ये उभ्या असून असं विधान करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओत ठाकोर म्हणतायत, भारतात प्रत्येकालाच कायद्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 50-150 लोकांना एकत्र यायला हवं. बलात्कार करणा-या त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन न करता जिवंत जाळलं पाहिजे.या विधानांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. 28 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आरोपींना त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली आहे. तो बिहारचा नागरिक आहे. व्हिडीओ माझ्या घरामध्ये तयार करण्यात आला आहे. हे कोणतंही सार्वजनिक रॅली किंवा संमेलन नव्हतं. मी जवळपास 100 महिलांना शांत करण्यासाठी असं विधान केलं होतं. त्याशिवाय माझा कोणताही उद्देश नव्हता. काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.