शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

IRCTC कडे ट्विटमधून तक्रार करणंच पडलं महागात, महिलेच्या अकाऊंटमधून कट झाले ६४ हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 18:49 IST

इंटरनेट आणि सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. या व्यासपीठावरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचता येतं.

नवी दिल्ली-

इंटरनेट आणि सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. या व्यासपीठावरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचता येतं. इतकंच नव्हे, तर आपल्या अडचणी देखील पब्लिक डोमेनवर सहजपणे व्यक्त करू शकतो. सोशल मीडियाचा फायदा फक्त लोकांना तर झालाच, पण स्कॅमर्सनंही वाढले आहेत. 

नेटिझन्सनं एक चूक केली की हॅकर्सना त्यांचं शिकार सापडतो. असंच काहीसा प्रकार मुंबईतील एका महिलेसोबत घडला आहे. एका चुकीमुळे महिलेच्या खात्यातून स्कॅमरनं ६४ हजार रुपये लंपास केले आहेत. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?पीडित महिलेला आपलं RAC तिकीट अपडेट करायचं होतं आणि यासाठी तिनं ट्विटरवर IRCTC ला टॅग करत एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये तिनं आपला मोबाइलनंबर आणि तिकीटाचे डिटेल्स शेअर केले. एमएन मिणा हिनं IRCTC च्या वेबसाइटवरुन १४ जानेवारीसाठी तीन तिकीट बूक केल्या होत्या. पण त्यांच्या तिकीट RAC झाल्या. त्यांनी आपल्या तिकीटाची माहिती मिळवण्यासाठी स्वत:चा नंबर आणि ट्रेन तिकीट IRCTC मेन्शन करत ट्विट केलं. हिच चूक महिलेला महागात पडली आणि स्कॅमरनं याचा गैरफायदा घेतला. 

२ रुपयांच्या पेमेंटसाठी कट झाले ६४ हजार रुपयेट्विट केल्यानंतर काही वेळानं एमएन मिणा यांना स्कॅमर्सकडून फोनकॉल आला. स्कॅमर्सनं स्वत:ला IRCTC चे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगितलं. तिकीट बुकींगसाठी मदत करण्यासाठी फोन केल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर स्कॅमरनं महिलेला फोनवर एक लिंक पाठवली आणि त्यात सर्व डिटेल्स भरण्यास सांगितलं. त्यानंतर स्कॅमरनं संबंधित लिंकवर दोन रुपयांचं एक ट्रान्झाक्शन करायला लावलं. महिलेनं अगदी तसंच केलं. महिलेनं संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिच्या अकाऊंटमधून ६४,०११ रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. 

महिलेला जेव्हा आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा ती पोलिसात केली. विलेपार्ले पोलीस ठाण्यात तिनं तक्रार दाखल केली आणि प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेनं तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ज्या नंबरवरुन फोन आला होता त्यावर पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण नंबर स्विच ऑफ असल्याचं आढळून आलं.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसी