शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रेल्वे ट्रॅकवर आढळला महिला हॉकी संघातील स्टार खेळाडूचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 11:12 IST

भविष्यात महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या खेळाडू ज्योती गुप्ता हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे

ठळक मुद्देज्योती गुप्ता हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे20 वर्षीय ज्योती गुप्ताने भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतंहरियाणामधील रेवारी येथे बुधवारी संध्याकाळी रेल्वे ट्रॅकवर तिचा मृतदेह आढळला

गुरुग्राम, दि. 4 - भविष्यात महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू म्हणून उदयास येऊ पाहणा-या खेळाडू ज्योती गुप्ता हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय ज्योती गुप्ताने भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं. तिचा खेळ पाहता भविष्यात एक मोठी खेळाडू म्हणून ती नावारुपाला येईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र तिचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. हरियाणामधील रेवारी येथे बुधवारी संध्याकाळी रेल्वे ट्रॅकवर तिचा मृतदेह आढळला. 

चंदिगड - जयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसच्या चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे ज्योती गुप्ताने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अचानक ट्रेनसमोर उडी मारली असल्याने ज्योती गुप्ता ट्रेनखाली आली असल्याचं चालकाने सांगितलं आहे. रेवारी स्थानकाजवळ रात्री 830 वाजता झज्जर रोड पुलावरुन जात असताना अचानक ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आली. यानंतर चालकाने रेल्वे पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेतला असताना ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला. 'ज्योती गुप्ता ट्रेनसमोर आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इतक्या जवळ होती की तोपर्यंत ट्रेन थांबणं शक्य नव्हतं', अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी रणवीर सिंग यांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने सर्वात शेवटचा फोन कॉल आपल्या सोनपतमधील घरी गेला होता. रात्री 7 वाजता फोन करुन बस खराब झाली असल्याने उशीर होईल असं तिने घरी कळवलं होतं. इतका उशीर होऊनही ज्योती घरी आली  नाही म्हणून रात्री 10.30 वाजता तिच्या आईने फोन केला असता रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत करत मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. 

स्ट्राईकर म्हणून खेळणा-या ज्योतीने हिमाचल प्रदेशातील शिलारु येथे जून महिन्यात पार पडलेल्या तीन महिन्यांच्या नॅशनल कोचिंग कॅम्पला हजेरी लावली होती. जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनच्या तयारीसाठी तिने गेल्या महिन्यात कसून तयारी केली होती. ऑगस्ट महिन्यात होणा-या कॅम्पलाही ती हजेरी लावणार होती. बुधवारी सकाळी सोनपत इंडस्ट्रियल परिसरात असलेल्या कोचिंग अकॅडमीत ती गेली होती. त्यानंतर घरी परतली होती. आपल्या दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरील काही चुका दुरुस्त करायच्या असल्याच्या सांगत ती घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर थेट तिच्या मृत्यूची बातमी आली.