शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस पोटात अन्नाचा कण नाही; महिलेनं अन्न अन्न करत सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 20:27 IST

गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे.

झारखंड- गिरिडिह जिल्ह्यातल्या डुमरी भागात एका 59 वर्षीय महिलेचा भूकबळी गेला आहे. काल या महिलेचा अन्नावाचून जीव गेला. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचं नाव सावित्री देवी आहे. सावित्री देवी या गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्ड मिळवण्यासाठी रेशनिंग ऑफिसमध्ये फे-या मारत होत्या. परंतु मुजोर अधिका-यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या सावित्री देवींना रेशनिंगच्या धान्याचाच आधार होता. त्यासाठी त्यांनी तीन दिवस रेशनिंग ऑफिसचा फेरफटका मारला, पण तरीही त्यांना धान्य काही उपलब्ध झाले नाही. तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यानं सावित्री देवींना अखेर अन्न अन्न करत जीव सोडावा लागला. या सर्व प्रकाराला रेशनिंग ऑफिसर जबाबदार असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी शीतल प्रसाद यांनी केला आहे.  दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.सासूच्या मृत्यूबाबत सून सरस्वती देवींनी दुःख व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, सावित्री देवी गेल्या तीन दिवसांपासून रेशन कार्डच्या मागणीसाठी रेशनिंग ऑफिसच्या फेरफटका मारत होत्या. परंतु त्याकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केलं. सावित्री देवींना गेल्या तीन दिवसांपासून अन्न मिळालं नाही. दोन्ही मुलं अंगमेहनत करून रोजी-रोटी मिळवतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुलं त्यांच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे परिस्थिती बिघडली. सावित्री देवी या भीक मागून अन्न खात असल्याचंही सून सरस्वती देवीनं सांगितलं आहे.या घटनेची डुमरीचे आमदार जगरनाथ महतो यांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच सावित्री देवींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनीही केला. विधानसभेत यासंदर्भात आम्ही आवाज उठवू, असंही ते म्हणाले आहेत. झारखंडमध्ये भूकबळीची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीसुद्धा राज्यातील सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला होता. त्याच्या काही काळानंतर 43 वर्षीय रिक्षा चालकाचाही अन्नावाचून मृत्यू झाला होता. सिमडेगामध्ये रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांना धान्य मिळालं नव्हतं. त्यामुळे 28 सप्टेंबर 2017रोजी एका चिमुकलीचाही मृत्यू झाला होता.