शिमलाः रक्त गोठवणारी थंडी, सगळीकडेच बर्फाची चादर, गारेगार बर्फावरून चालत रोहतांग पास ओलांडताना एखाद्याची चांगलीच भंबेरी उडेल. 20 फूट बर्फातून चालत रोहतांग पास पार करणं हा काही लहान मुलाचा खेळ नाही. परंतु एका आईच्या ममतेपुढे हा रोहतांगचा पर्वतही फिका पडला आहे. पाच महिन्यांचा स्वतःचा मुलगा आणि दुसरं सामान घेऊन एका प्रवासी मजूर महिलेनं 34 किलोमीटर चालत 13050 फुटांचा रोहतांग पास ओलांडला आहे.बचावकार्य राबवणारी टीम महिलेला वाचवण्यासाठी आली असता, त्या महिलेनं अतुलनीय शौर्याचा परिचय देत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला आहे. त्या महिलेनं दाखवून दिलं की, जर एका स्त्रीनं ठरवलं, तर ती कधीही पराजित होऊ शकत नाही. नेपाळमधल्या देलक जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या भरत आणि त्यांची पत्नी कृष्णा हे मजूर असून, दरवर्षी शेतीसाठी ते नेपाळहून मार्च महिन्यात लाहोलच्या जाहलमा येथे येतात. यंदा हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यानं कुल्लूहून राहनीनालाच्या जवळपास प्रतिसवारी 500 रुपये देऊन ते पोहोचले.
कशासाठी... पोटासाठी...; पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन माऊली बर्फातून ३४ किमी चालली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 13:46 IST