शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! महिलेनं 10 लाख साठवून गावासाठी घेतली रुग्णवाहिका; मन हेलावून टाकणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 19:34 IST

Ambulance : रुग्णवाहिकेअभावी गावात कोणालाही जीव गमवावा लागू नये म्हणून मोठं पाऊल उचललं आहे

नवी दिल्ली - वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेने आपला पती गमावला होता. पण आता रुग्णवाहिकेअभावी गावात कोणालाही जीव गमवावा लागू नये म्हणून तिने मोठं पाऊल उचललं आहे. महिलेने गावाला रुग्णवाहिका दान केली आहे. तिने पेन्शन आणि इतर पैशांची बचत करून तब्बल दहा लाख रुपये जमा झाल्यावर रुग्णवाहिका खरेदी केली आहे. धर्मादेवी असं या महिलेचं नाव असून त्या राजस्थानच्या फतेहपूर शेखावटीमध्ये राहतात. या महिलेच्या दानशूरपणाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. नीमकाथाना येथील रहिवासी धर्मादेवी यांचे पती सेवानिवृत्त सुभेदार यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आणि आता 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका खरेदी करून ती गावातील रुग्णालयाला सुपूर्द केली. रुग्णवाहिका नसल्यामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, हा त्यामागचा हेतू आहे. धर्मा देवी यांचा मुलगा आणि सरपंच शेर सिंह तन्वर यांनी सांगितलं की, त्यांचे वडील रावत सिंह तन्वर यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. रात्र असल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कार सापडली नाही. 

रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांच्या वडिलांना वाचवता आले नाही. आई धर्मादेवी आणि भावांनी तेव्हापासून गावासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून ते पैसे गोळा करत होते. अखेर त्यांनी 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका खरेदी केली आणि गावच्या रुग्णालयाकडे गावकऱ्यांच्या सोयीसाठी सुपूर्द केली. गावामध्ये मोठे रुग्णालय नसल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना नीमकाथाना किंवा जयपूरला न्यावं लागतं. डोंगराळ भाग असल्याने नीमकाथाना येथून रुग्णवाहिका येण्यास वेळ लागतो. 

रुग्ण वेळेत पोहोचण्याची शक्यता अत्यंत कमी असते, परिणामी त्यांना जीव गमवावा लागतो. परंतु आता रुग्णवाहिका उपलब्ध असल्यामुळे गरजूंना रुग्णवाहिका सहज मिळू शकते. रुग्णवाहिका चालवण्याचा संपूर्ण खर्चदेखील धर्मादेवी देतील. डिझेल, चालकाचा पगार आणि रुग्णवाहिकेच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च सर्व त्याच देणार आहेत. रुग्णांकडून कोणतेही पैसे आकारले जाणार नाही. रुग्णवाहिका हवी असेल, तर त्यासाठी कॉल करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकदेखील जारी केला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.