शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा जिवंत करतो सांगून तांत्रिकांनी 45 दिवस बंद खोलीत ठेवला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 17:19 IST

एका आजारी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच तांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक झाली असून मुख्य आरोपी गजेंद्र सिंह अजूनही फरार आहे.

ठळक मुद्देअनिताला सैतानी शक्तीने झपाटले असून आपणच तिला बरे करु शकतो असा दावा या मांत्रिकांनी केला.अनिताला तिच्या खोलीमध्ये बंद केल्यानंतर ती स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल असे खोटे आश्वासनही त्यांनी दिले.

जयपूर - एका आजारी महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच तांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक झाली असून मुख्य आरोपी गजेंद्र सिंह अजूनही फरार आहे. या पाच तांत्रिकांनी आजारी महिलेला डॉक्टरकडे नेण्यापासून तिच्या नातेवाईकांना रोखले. आपण तंत्र-मंत्रांच्या आधारे महिलेला रोग मुक्त करु, तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आपण  तिला पुन्हा जिवंत करु असे कुटुंबियांना सांगत तिचा मृतदेह 45 दिवस खोलीत बंद करुन ठेवला. 

राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरात ही घटना घडली. अनिता असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या भावाने शामने या प्रकरणी एफआयआर दाखल केला. जानेवारी महिन्यात अनिता आजारी पडली. तिचे आई-वडिल तिला मांत्रिकांकडे घेऊन गेले. अनिताला सैतानी शक्तीने झपाटले असून आपणच तिला बरे करु शकतो असा दावा या मांत्रिकांनी केला. त्यांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यापासूनही रोखले. 

14 जानेवारीला अनिता बेशुद्ध पडली. त्यावेळी तांत्रिकांनी तिला तिच्या घराच्या रुममध्ये बंद केले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अनिताला तिच्या खोलीमध्ये बंद केल्यानंतर ती स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल असे खोटे आश्वासनही त्यांनी दिले. मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरु नये यासाठी ते खोलीमध्ये, मृतदेहावर अत्तराची फवारणी करायचे. या दरम्यान त्यांनी अनिताच्या दोन बहिणी आणि तिच्या आई-वडिलांना घराबाहेर पडू दिले नाही. 

27 फेब्रुवारीला अनिताला ज्या खोलीत बंद करुन ठेवले होते तिथून दुर्गंधी येऊ लागली. त्यावेळी अनिताची बहिण मोहिनी कशीबशी घरातून बाहेर पडली व तिने जवळच राहणाऱ्या भावाचे शामचे घर गाठले व सर्व  प्रकार सांगितला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उजेडात आला.