शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला विश्वासात न घेता सेना उमदेवारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:50 IST

नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंंबई : राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेतील दरी दिवसेंदिवस वाढत असून भाजपाला विश्वासात न घेता नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या आधी मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपाने परस्पर उमेदवार जाहीर केले होते. शिवसेनेने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा वर्षांपूर्वीची विधान परिषद निवडणूक शिवसेनेने लढविली होती आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपाशी पाठिंब्याची कोणतीही बोलणी न करता शिवसेनेने उमेदवार निश्चित केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मातोश्रीवर बैठक झाली. तीत नाशिकमध्ये दराडे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. शिवसेना व भाजपा वेगळे लढले आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तर भाजपा वा शिवसेनेला विजय मिळविणे कठीण जाईल. राष्ट्रवादीचे जयंत जाधव हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना दोन दिवसांपूर्वी उमेदवारी दिली आहे. अनिकेत हे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र आहेत. या दोघांना उमेदवारी देताना भाजपाने आम्हाला कुठे विश्वासात घेतले, असा सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला.कर्नाटकात ६० जागा लढणारकर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ६० जागा लढत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा असेल.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८