शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होत्या; पाकिस्तानी महिलेचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 12:39 IST

एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं आहे. या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं आहे.या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर आमचा देश आज बदलला असता', असं ट्विट पाकिस्तानी महिला हिजाब आसिफ यांनी केलं आहे.

नवी दिल्ली, दि. 28- ट्विटरवर लोकांनी पोस्ट केलेल्या समस्यांचं तात्काळ निवारण करत असल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नेहमीच चर्चेत असतात. तात्काळ मदतीच्या सुषमा स्वराज यांच्या वृत्तीमुळे त्यांनी हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. सुषमा स्वराज यांची ही ख्याती फक्त भारतातच नसून भारताबाहेरही असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं आहे. या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'तुम्हाला खूप सारं प्रेम आणि आदर. जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर आमचा देश आज बदलला असता', असं ट्विट पाकिस्तानी महिला हिजाब आसिफ यांनी केलं आहे.

पाकिस्तानमधील एका व्यक्तीला उपचारासाठी भारतात यायचं होतं. पण त्या व्यक्तीचं वैद्यकिय व्हिजासाठीचा अर्ज अडकून पडला होता. या व्यक्तीच्या मदतीसाठी हिजाब आसिफ यांनी ट्विटरवर सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनी हिजाबला नाराज न करता लगेचच कारवाई करत भारतीया दूतावासाला या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले. भारतीया दूतावासाने एक ट्विट करत हिजाबला आश्वासन दिलं की त्यांची विनंती लक्षात ठेवून कारवाई केली जाते आहे. सुषमा स्वराज यांनी हिजाब यांच्या मदतीसाठी दाखवलेली तत्परता हिजाबला चांगलीच भावली आणि तिने आनंदीत होऊन ट्विट केलं. एका दुसऱ्या ट्विटमध्ये सुषमा स्वराज यांचे आभार मानताना हिजाबने म्हंटलं आहे. तुम्हाला मी नेमकं काय म्हणू ? सुपरवूमन म्हणू की देव म्हणू ? तुम्ही केलेल्या मदतीसाठी आभार मानायला मला शब्द कमी पडत आहेत. तुम्हाला खूप प्रेम. आज तुम्हाला धन्यवाद देताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रृ आहेत आणि माझं तोंड तुमची सुस्ती करणं बंद करत नाहीये. 

या आठवड्याच्या सुरूवातीला एका भारतीय नागरीकाने त्याच्या पाकिस्तानी पत्नीच्या व्हिजासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. त्या व्यक्तीच्या विनंतीवर सुषमा स्वराज यांनी दिलेलं उत्तरही चर्चेचा विषय ठरलं होतं. 'भारताच्या मुली आणि पाकिस्तानसहीत दुनियेच्या कोणत्याही भागातून येणाऱ्या सुनांचं या देशात नेहमीच स्वागत आहे', असं स्वराज म्हणाल्या होत्या.दरवर्षी अनेक पाकिस्तानी नागरीक भारतात उपचारासाठी येतात. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे वैद्यकिय विजाला मंजूरी देणारी प्रक्रिया संथ गतीने होत होती. 

ओसामाला दिला व्हिसा

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अली याला उपचारासाठी भारतात यायचं आहे. मात्र त्याला पाकिस्तानकडून कोणतीही परवानगी दिली जात नव्हती ओसामाच्या यकृतामध्ये गाठ असून उपचारासाठी त्याला दिल्लीला यायचं आहे. यासाठी नियमांचं पालन करत प्रक्रियेप्रमाणे त्याला सरताज अजीज यांना पत्र लिहायचं होतं, आणि ते पत्र भारतीय दुतावासामध्ये द्यायचं होतं. पण त्याने असं काही केलं नाही, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. अशावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत ओसामाला मदत केली. त्यांनी ओसामाला कोणत्याही पत्राविना उपचारासाठी मेडिकल व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचारासाठी यायचं असले तर सरताज अझीझ यांचं पत्र आणणं अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं. पत्र आणल्यास तात्काळ व्हिसा देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कोणत्याही पत्राविना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला.