शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन आर्मी क्विझमध्ये जिंका ४ कोटींची बक्षिसे; ‘कारगिल विजय’निमित्ताने आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 07:17 IST

देशातील दीड लाख शाळा सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तरुण पिढीमध्ये भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाविषयी जागरूकता पसरविण्यासाठी आणि कारगिलमधील विजयाचे २५ वे वर्ष साजरे करण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवारी नवी दिल्लीतील माणेकशॉ क्लबमध्ये ‘इंडियन आर्मी क्विझ’ सुरू केली. ‘बॅटल ऑफ माइंड्स’ शीर्षक असलेल्या या क्विझचे उद्दिष्ट देशभरातील सुमारे १५,००० शाळांपर्यंत पोहोचण्याचे आहे. 

ही प्रश्नमंजूषा १० ते १६ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. ती तीन टप्प्यांत होईल. त्याची सुरुवात ऑनलाइन फेरीपासून होईल, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय फेऱ्या होतील. विशेष म्हणजे, शाळा, विद्यार्थी आणि सोबत असलेल्या शिक्षकांसाठी ४ कोटी रुपयांहून अधिक बक्षिसे, टॉप १२ शाळांसाठी बसची सुविधा आणि ३६० हून अधिक लॅपटॉप्ससह इतर बक्षिसे आहेत.

देशातील दीड लाख शाळा सहभागी होणार

- या उपक्रमात सहभागी होण्याची संधी भारतातील सर्व जिल्ह्यांना खुली असून  देशभरातील सुमारे दीड लाख शाळा यात सहभागी होऊ शकतात. - अशा प्रकारे, या स्पर्धेत देशभरातील अंदाजे १.५ कोटी विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.  तीन विद्यार्थी आणि एक राखीव विद्यार्थी, अशा संघासह शाळांनी सहभागी व्हायचे आहे.  - सह-शैक्षणिक शाळांमधील म्हणजे मुले-मुली एकत्र शिकत असलेल्या शाळांमधील संघांमध्ये किमान एक विद्यार्थिनी असणे अनिवार्य आहे.  - सहभागींची वयोमर्यादा १० ते १६ वर्षे  (म्हणजे साधारणपणे सहावी ते दहावी इयत्ता) अशी आहे.  ही स्पर्धा, ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाईल.

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन