शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sidhu Moose Wala : “आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 08:24 IST

Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाचे सुरक्षा कवच कमी करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारला आता राज्याची तिजोरी भरणार का असा सवाल केला.

Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाचे सुरक्षा कवच कमी करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारला आता राज्याची तिजोरी भरणार का असा सवाल केला. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (२७) यांची रविवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील मान सरकारने शनिवारीच त्यांची सुरक्षा काढली होती. यापूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. पण, सध्या त्यांच्याकडे केवळ दोन गनमॅन होते. मुसेवाला यांच्यावर मनसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

हल्लेखोरांनी रविवारी भरदिवसा त्यांची हत्या केली. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा ते आपल्या महिंद्रा थार जीपनं प्रवास करत होता. पंजाब सरकारनं शनिवारी ४२४ जणांची सुरक्षा कमी करण्याचे किंवा काढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता.

मंगळवारी मुसेवाला यांच्या अंत्यसंस्काराच्या अगोदर, त्यांच्या घरातील एका व्हिडीओमध्ये मुसेवाला यांच्या आई चरण कौर या “सरकरला संदेश द्यायचा आहे की तुम्ही हिरे गमावत आहात" असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आमच्या मुलासोबत चार जणांच्या तैनातीनं काय फरक पडतो? आता तुमची तिजोरी भरणार आहे का? तुमचा खजाना भरा, असंही चरण कौर म्हणाल्या. मुसेवाला यांच्या सुरक्षेत यापूर्वी पंजाब पोलिसांचे चार कमांडो तैनात होतेत. त्यानंतर सुरक्षेत कपात करत दोन कमांडोंना हटवण्यात आलं.

सुरक्षा काढल्याने होते चिंतेतआपली सुरक्षा घटविण्यात आल्याने मुसेवाला हे काळजीत होते. पर्यायी उपाययोजनेसाठी त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चाही केली होती. आपल्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही नोटीस न देता आपली सुरक्षा कमी केली असून, हे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून निवडणूक लढविली होती. ‘आप’चे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा पराभव केला होता. आरोग्यमंत्री करण्यात आलेल्या सिंगला यांना अलीकडेच मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले होते. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबAAPआप