शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसोबत विधानसभा खरोखर फायदेशीर ठरेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:18 IST

एकाचवेळी निवडणुकीसाठी संसद कायदा करू शकते किंवा त्यासाठी दोन तृतीयांश राज्यांची संमती आवश्यक आहे.

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घेण्याची केंद्र सरकार तयारी करत आहे. मात्र ही काही एका दिवसातील प्रक्रिया नाही. त्यासाठी किमान पाच घटनादुरुस्ती कराव्या लागतील. याचवेळी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) आणि पेपर ट्रेल मशीनची आवश्यकता असेल, ज्याची किंमत हजारो कोटी रुपये असणार आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधक आणि अनेक बिगरभाजप शासित राज्यांची यासाठी परवानगी लागेल.

अनेक शिफारसी...संसदेच्या एका समितीने निवडणूक आयोगासह विविध संस्थांशी सल्लामसलत करून एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याची तपासणी केली होती. यासंदर्भात समितीने काही शिफारशी केल्या आहेत. एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी “कार्यक्षम रोड मॅप आणि फ्रेमवर्क” तयार करण्यासाठी हे प्रकरण आता कायदा आयोगाकडे पाठवण्यात आले आहे.

विरोधकांना किंमत आहे का?एकाचवेळी निवडणुकीसाठी संसद कायदा करू शकते किंवा त्यासाठी दोन तृतीयांश राज्यांची संमती आवश्यक आहे. याचवेळी शासन व्यवस्थेची संघराज्यीय रचना लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

विरोध का होतोय?- देशाच्या आणि राज्यांच्या समस्या वेगळ्या. निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मतदारांच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता असते. - स्थानिक मुद्यांना आणि पक्षांना महत्त्व राहणार नाही. स्थानिक पक्ष निवडणूक खर्च आणि निवडणुकीच्या रणनीतीच्या बाबतीत राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.- एकदा निवडणुका घेतल्या तर सरकारची जनतेप्रती असलेली जबाबदारी कमी होईल. - लोकसभा निवडणुकीत विजयी पक्षांना चांगले काम केले नाही तर विधानसभेत अडचणी येतात.- एकाच वेळी निवडणूक झाल्यास मतदार विधानसभा व लोकसभेतही एकाच राजकीय पक्षाला वा आघाडीला निवडतात. याची शक्यता ७७% इतकी अधिक असते.

सततच्या निवडणुकांमुळे काय? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे (पोटनिवडणुकीसह) आदर्श आचारसंहितेची दीर्घकाळ अंमलबजावणी सुरू असते. त्यामुळे विकासात्मक आणि कल्याणकारी कार्यक्रमांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

अडचणी काय आहेत?यासाठी बहुतांश गैरभाजप सरकार त्यास विरोध करतील. नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यांचे काय होणार? ही सरकारे बरखास्त होणार का? विरोध झाल्यास हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता.

काय तयारी करावी लागेल? अतिरिक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीन लागतील, याला हजारो कोटी खर्च येईल.मशीनचे आयुष्य फक्त १५ वर्षे असते. यामुळे मशीन तीन किंवा चार वेळा वापरली जाईल. त्यामुळे ती १५ वर्षांनी बदलण्याची आवश्यकता असेल. या मोठ्या लोकशाही प्रक्रियेसाठी अतिरिक्त मतदान कर्मचारी आणि सुरक्षा दलांची देखील आवश्यकता असेल.

टॅग्स :VotingमतदानOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन