शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान राजीनामा देतील का?; चौथी पास राजाकडून काय अपेक्षा करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 05:52 IST

निवासस्थान नूतनीकरण चौकशीवरून वाद

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या चौकशीत काहीच आढळले नाही तर खोटी चौकशी केल्याच्या गुन्ह्याखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देतील काय? असे आव्हान काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.

सीबीआय चौकशी सुरु झाल्यामुळे आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. सीबीआय चौकशीतून त्यांची भीतीच दिसते आहे. आपल्याविरुद्ध चौकशी ही नवी गोष्ट नाही. शाळा, बस, मद्य, रस्ते, पाणी, वीज घोटाळ्यांच्या आरोपांसह जगात सर्वात जास्त चौकशी आपली झाली असेल. कोणत्याच प्रकरणात काहीही मिळाले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

एका चौथी पास राजाकडून आणखी अपेक्षाही काय करता येईल ते २४ तास चौकशीचे गेम खेळत असतात किंवा भाषणे देत असतात. आपल्याविरुद्ध ३३ पेक्षा जास्त प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. आता आणखी एका नव्या चौकशीची त्यात पडली. पण आपण झुकणार नाही. त्यांनी या प्रकरणाचीही चौकशी करुन घ्यावी, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. हा भाजप सरकारचा आम आदमी पार्टीला भयभीत करुन तोडण्याचा प्रयत्न  आहे, अशी आक्रमक भूमिका केजरीवाल यांनी घेतली.  

सुटका मुश्कील : तिवारीकेजरीवालचे सरकार हे गुन्हेगारांनी चालविलेले सरकार आहे. सीबीआय या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन सर्व सत्य बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केली. देशाच्या राजकीय इतिहासात जन्माला आल्यानंतर अल्पावधीत सर्वसामान्यांना खजिना लुटण्याचा पराक्रम ‘आप’ने केला आहे. या प्रकरणातून केजरीवाल यांची सुटका मुश्कील आहे.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल