शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द होणार? समान नागरी कायद्याने वादाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 12:36 IST

केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्यावरून गदारोळ होण्याची व संसदेचे आखाड्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. केंद्राने देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी होत आहे. परंतु तत्पूर्वी सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे रद्द करण्याचे मोठे आव्हान आहे.

हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चनांचे विवाह कायदे, वारसा कायदे, मालमत्ता कायदे, कुटुंब कायदे, बहुविवाह प्रथा, दत्तक कायदा, बालके व वृद्धांशी संबंधित कायद्यांवर कायदेशीर वाद व पेच एवढा मोठा आहे की, त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्यात आला नाही तर देशभरात नवा वाद उभा राहू शकतो.

लिव-इन, समलैंगिकता यासारख्या विषयांचाही यात समावेश करण्यात आला आहे. विधी आयोगाने ३० दिवसांची नोटीस जारी करून धार्मिक संघटना, सामाजिक संघटनांकडून मते मागवली आहेत. ३० दिवसांनंतर विधी आयोग आपली शिफारस केंद्राला पाठवणार आहे. केंद्र सरकार विधी आयोगाच्या शिफारशी असलेले विधेयक मंत्रिमंडळात पारित करून संसदेत सादर करू शकते.

विधी तज्ज्ञांची टीम

विधी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली असून, समान नागरी कायद्याच्या प्रत्येक पैलूवर अभ्यास केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार राज्यांत कायदा लागू करून कायदेशीर, तांत्रिक उणिवा दूर करण्यात येतील.

आधी उत्तराखंडमध्ये लागू होणार

  • सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, गोव्यात समान नागरी कायदा आधीपासूनच लागू आहे. उत्तराखंडमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागू होऊ शकतो. 
  • गुजरात, आसाम व उत्तर प्रदेशातही कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात हा कायदा लागू करू इच्छित आहे. 
  • भाजपचे तीन प्रमुख मुद्दे 
  • कलम ३७०, राममंदिर व समान नागरी कायदा, यापैकी दोन मुद्द्यांची पूर्तता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झाली. आता फक्त एकच मुद्दा राहिला असून, त्यावर वेगाने काम सुरू आहे.
  • निवडणुकीचा अजेंडा निश्चित 
  • २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू होईल व अयोध्येत राममंदिरही सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले जाईल. म्हणजेच २०२४चा मोदी सरकारचा निवडणूक अजेंडा निश्चित झालेला आहे.

कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा रद्द

कर्नाटक सरकारने गुरुवारी मागील भाजपने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :Indiaभारत