शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार? केजरीवाल नायब राज्यपालांची घेणार भेट; आपची आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 05:57 IST

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी काही नावांबाबत चर्चा केल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :आपच्या विधिमंडळ पक्षाची मंगळवारी सकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल चर्चा होईल. त्यानंतर अरविंद केजरीवाल नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  साेपविण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा  राजीनामा देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी रविवारी केली होती. त्यानंतर केजरीवाल यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा रंगल्या आहेत. ते नाव उद्या किंवा परवा निश्चित होण्याची शक्यता आहे. केजरीवाल मंगळवारी संध्याकाळी साडे चार वाजता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेणार आहेत. 

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी काही नावांबाबत चर्चा केल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले. 

‘आप’च्या आमदारांतूनच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड

आपच्या आमदारांमधूनच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार नसलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा प्रयोग अरविंद केजरीवाल सध्या करण्याची शक्यता नाही, असे त्या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. केजरीवाल यांच्याशी निष्ठावान असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. यात आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांची नावे शर्यतीत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप