एसटी कामगारांचे प्रश्न सोडविणार
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन
एसटी कामगारांचे प्रश्न सोडविणार
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : राज्य परिवहन महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते. एसटीचे कामगार वंचितांना सेवा देतात. त्यामुळे या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नोकर भरतीत कामगारांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण, वैद्यकीय अपात्र कर्मचार्यांच्या पाल्यांना नोकरी, वैद्यकीय कॅशलेस योजना, मोफत पास सर्व गाड्यांना लागू करणे आणि निवृत्त कर्मचार्यांना पती-पत्नीस वर्षभर मोफत पास देण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगतानाच कनिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)