शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बळी गेल्यावर रस्ता सुधारणार का?

By admin | Updated: July 21, 2016 22:23 IST

नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.

नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे आश्वासने फोल ठरल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून या रस्त्यांचे नशीब कधी पालटणार याच्या प्रतिक्षेत आहे.
गावातील दोन प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. पोलीस स्टेशनजवळ, पाण्याची टाकी, सातीबाजार उंचआड, युनियन बँक, भवानीनगर, बसस्थानक आदी ठिकाणी खड्डे आहे. ही स्थिती प्रमुख रस्त्यांची असून गल्लीबोळासह न्यू प्लॉट एरियात रस्त्यानची अवस्था दयनीय होत आहे. पोलीस स्टेशनजवळील रस्त्यावर वाहनाचे टायर तर रस्त्याच्या चकोरीत अटकून अपघात झाले आहे. काहींना दुखापत झाल्याच्या घटना आहे. मात्र सुस्त ग्रामपंचायत साधी डागडुजीही करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता काय एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येणार काय? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. पावसाळ्यात खड्डेंमुळे साचलेल्या पाण्यात खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात व वाहनांचे नुकसान होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

दरम्यान रस्त्यांच्या डागडुजींसह इतर समस्यांबाबत ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज समितीने निवेदने दिली. उपोषणाचा इशारा दिला. मात्र ३० जूनपर्यंत रस्त्यांसह सर्व समस्या मार्गी लागतील असे लेखी आश्वासन सरपंच खिलचंद रोटे, ग्रामविकास अधिकारी डी.आर.शिरतुरे यांनी समितीला दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित झाले. मात्र महिना उलटल तरीही समस्या जैसे थे च आहे. मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. स्मार्ट व्हिलेज समिती व लोकप्रतिनिधी मौन धरून बसले आहे.

पावसाळा सुरू झाला असूनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनास्था का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)