शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

RCB टीम खरेदी करणार का? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मी रॉयल चॅलेंजर पीत नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:29 IST

काही दिवसांपासून रॉयल चॅलेंजर बंगळुरू टीम खरेदी बाबत चर्चा सुरू आहेत. ही टीम कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार खरदी करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू टीम या वर्षी विजेता ठरली. काही दिवसांपूर्वी RCB टीम आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे आरसीबी टीमची मालकी कंपनी Diageo संघ विकण्याचा विचार करत आहे. त्या टीमचे मूल्यांकन सुमारे २ अब्ज डॉलर्स असल्याचेही उघड झाले. ही टीम  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार खरेदी करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता या चर्चांवर स्वत: डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. 

हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा

आरसीबीची टीम खरेदीच्या चर्चांना आता डीके शिवकुमार यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते  आरसीबीला खरेदी करण्याच्या बातम्यांचे खंडन करत आहेत. यावेळी ते म्हणाले की, या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही. यावेळी डीके शिवकुमार म्हणाले की,  मला आरसीबीची गरज का आहे, मी रॉयल चॅलेंजही पीत नाही. आता त्यांच्या या विधानाची  चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओमध्ये, डीके शिवकुमार आरसीबीला खरेदी करण्याच्या वृत्ताचे खंडन केले.ते म्हणाले की, 'मी वेडा नाही. मी बऱ्याच काळापासून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. माझ्याकडे वेळही नाही, जरी मला व्यवस्थापनाचा भाग होण्याच्या ऑफर आल्या होत्या...मला आरसीबीची काय गरज आहे? मी रॉयल चॅलेंजही पीत नाही.'

कंपनीनेही खंडण केले

सध्या डीके शिवकुमार यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरसीबीची मूळ कंपनी डियाजियो इंडियाने या प्रकरणी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे अहवाल केवळ अटकळ आहेत आणि आरसीबी विकण्यासाठी कोणतीही चर्चा सुरू नाही. डियाजियोचे सीएस मित्तल संघवी यांनी बीएसईला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कंपनी हे स्पष्ट करू इच्छिते की सदर मीडिया रिपोर्ट्स या फक्त अफवा आहेत.'

टॅग्स :Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरKarnatakकर्नाटक