शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार; आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 06:37 IST

corona vaccine: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन; उत्तर प्रदेशमध्ये संक्रांतीपासून (१४ जानेवारी) कोरोना लसीकरणाला प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. देशपातळीवर कोरोना लसीकरणाची तारीख अद्याप जाहीरही झालेली नसताना, योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केले. आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल, असेही ते म्हणाले. 

त्यांनी सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक व २ कोटी कोरोना योद्धे यांना लस मोफत दिली जाईल, अन्य २७ कोटी लोकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांसहित आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, तसेच ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे. या लसीकरणाची रंगीत तालीम शनिवारी देशभरात पार पडली. दिल्लीतील दोन ठिकाणांना भेट देऊन,  आरोग्यमंत्र्ऱ्यांनी कामाची पाहणी केली. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. लसीची सुरक्षितता व परिणामकारकतेबाबत लोकांनी निश्चिंत राहावे, असेही ते म्हणाले. 

कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारसभारत बायोटेक कंपनी विकसित करीत असलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांना केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीस्को)ने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने कोवॅक्सिन बाबतची शिफारस केली आहे. या आधी ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, अशी शिफारस या तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली होती.

केंद्राने गरिबांना मोफत लस द्यावी - राजेश टोपेजालना : कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज आहे. त्या अनुषंगाने राज्यात लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम घेतली जात आहे. देशातील एका कंपनीची लस तयार असून, लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, केंद्र सरकारने गरिबांना मोफत लस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तथापि, ती न दिल्यास राज्य सरकार त्यांना लसीपासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीला ड्रग अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. परवानगी मिळाल्यास राज्यातील प्रशासन  लसीकरणासाठी सज्ज असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात संक्रांतीचा मुहूर्त उत्तर प्रदेशमध्ये संक्रांतीपासून (१४ जानेवारी) कोरोना लसीकरणाला प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. देशपातळीवर कोरोना लसीकरणाची तारीख अद्याप जाहीरही झालेली नसताना, योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मी कोरोना लस टोचून घेणार नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केले. भाजप सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनातून ९९ लाखांहून अधिक झाले बरेनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी २० हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गातून ९९ लाखांपेक्षा अधिक जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.१२ टक्के आहे. सध्या अडीच लाख रुग्णांवरच उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या