शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये होणार हे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 10:01 IST

जम्मू-काश्मीर व लडाखचे बुधवारी मध्यरात्रीपासून दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले

जम्मू-काश्मीर व लडाखचे बुधवारी मध्यरात्रीपासून दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले असून, एक नवा इतिहास घडला आहे. ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेसाठी 31 ऑक्टोबर हा दिवस निश्चित केला होता. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत.जम्मू-काश्मीर आजपासून दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित झालेलं आहे. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्य अस्तित्वात आली आहे. जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना कायद्यांतर्गत लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल, तर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश तयार झाला आहे. 

दोन्ही केंद्रशासित राज्यांत हे होणार नवे बदल...

  • आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपालपद होतं. परंतु आता दोन्ही राज्यांना उपराज्यपाल मिळणार आहेत. जम्मू-काश्मीरसाठी गिरीश चंद्र मुर्मू, तर लडाखसाठी राधाकृष्ण माथुर यांना उपराज्यपाल बनवण्यात आलं आहे. 
  • आता दोन्ही राज्यांचं एकच उच्च न्यायालय असेल. परंतु दोन्ही राज्यांचे एडव्होकेट जनरल वेगवेगळे असतील. सरकारी कर्मचाऱ्यांनाही दोन्ही केंद्रशासित राज्यांपैकी एका राज्याची निवड करावी लागणार आहे, 
  • राज्यात आधी केंद्रीय कायदे लागू होत नव्हते, परंतु जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे झाल्यामुळे दोन्ही राज्यांत जवळपास 106 केंद्रीय कायदे लागू होणार आहेत. 
  • या राज्यांत केंद्र सरकारच्या योजनांबरोबरच केंद्रीय मानवाधिकार कायदा, माहिती अधिकार कायदा, एनपी प्रॉपर्टी अॅक्ट आणि सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचवण्यापासून रोखण्याचे कायदे लागू होणार आहेत. 
  • आतापर्यंत जमीन आणि नोकरीमध्ये फक्त तिकडच्या स्थानिकांचा अधिकार होता. आता केंद्रशासित प्रदेश बनल्यापासून तिथे 7 कायद्यांमध्ये बदल होणार आहे. 
  • राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत जम्मू-काश्मीरमधले जवळपास 153 कायदे संपुष्टात येणार आहे. ज्यांना राज्याच्या स्तरावर बनवण्यात आले होते. 166 कायदे दोन्ही केंद्रशासित राज्यांत लागू झालेत. 
  • राज्य पुनर्रचनेनंतर प्राशसकीय आणि राजनैतिक व्यवस्थाही बदलणार आहे. जम्मू-काश्मीरमधल्या विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा राहणार आहे. 
  • विधानसभेत अनुसूचित जातीबरोबरच अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. 
  • पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये 24 मंत्री होते. आता दुसऱ्या राज्यांसारखं एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्क्यांहून अधिक मंत्रिपदं तयार करण्यात येणार नाहीत. 
  • जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतच पहिल्यांदा विधान परिषद होती. आता तसं नसेल. राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या जागांवर कोणताही परिणाम होणार नाही.  
  • केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधून 5 आणि केंद्रशासित लडाखमधून 1 लोकसभेचा सदस्य निवडून येणार आहे. अशा प्रकारे केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधून पहिल्यासारखं राज्यसभेचे 4 खासदार निवडून येणार आहेत.  
  • 31 ऑक्टोबरला निवडणूक आयोग राज्यातील परिसीमेची प्रक्रिया सुरू करू शकते. ज्यात लोकसंख्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 
  • जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 87 जागांवर निवडणुका होत होते. ज्यात 4 लडाख, 46 काश्मीर आणि 37 जागा जम्मू-काश्मीरच्या आहेत. लडाखच्या 4 जागा हटवून केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये 83 जागा आहेत. 
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर