शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

बेळगावात वन्यप्राण्यांचे अवयव जप्त

By admin | Updated: October 12, 2016 10:47 IST

कोट्यवधी रुपये किमतीची सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे पोलिसांनी जप्त केले.

बेळगाव, दि. १२ - कोट्यवधी रुपये किमतीची सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे पोलिसांनी शहरातून जप्त केले असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर मारिहाळ आणि जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी दिली.शेट्टीगल्ली येथील एका घरावर छापा मारून पोलिसांनी प्राण्यांची शिंगे, नखे, सुळे आणि कातडे हस्तगत केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले याला अटक केली आहे. ज्या घरात प्राण्यांची शिंगे, हिस्तदंत आणि अन्य वस्तू ठेवण्यात येत होत्यास त्या घरात भूत असल्याची अफवा गल्लीत पसरविण्यात आली होती. त्यामुळे त्या घराकडे कोणी फिरकत नव्हते. घरात वीज देखील नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे काय चालते. हे कोणालाही समजत नसे. सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगे आणि अन्य वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. नंतर शिंगे, हस्तीदंत, वाघाची नखे आणि खवल्या मांजराचे कातडे आदी कारमधून मुंबईला न्यायचा. तेथून ते चीनला पाठवले जायचे.