शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 5 वर्षात तब्बल 35 वेळा पळून गेली बायको; 2 मुलांना घेऊन नवरा मागतोय भीक, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:53 IST

गेल्या पाच वर्षात पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

देशात अनेक धक्कादायक घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक पती आपल्या पत्नीमुळे फास त्रस्त झाला आहे. गेल्या पाच वर्षात त्याची पत्नी एकदा दोनदा नव्हे तर 30 ते 35 वेळा त्याला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. मात्र तरीही त्याचे पत्नीवरील प्रेम कमी झालेले नाही. पत्नीला शोधण्यासाठी मदत करा असं म्हणत आहे. याचना करत आहे. हे प्रकरण रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारक गावातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन लहान मुलांसह रस्त्यावर भटकणाऱ्या पतीचं नाव कृष्णा मुरारी गुप्ता असं आहे. त्याने आता रामगड पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची नोंद केली आहे. कैमूर येथील रहिवासी असलेल्या कृष्णा मुरारी गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात सांगितले आहे की, त्याच्या पत्नीने त्याला एकदा नव्हे तर 30 ते 35 वेळा सोडले आहे. त्याला दोन मुले असल्याचे तो सांगतो. मोठा मुलगा 4 वर्षांचा आणि मुलगी 4 महिन्यांची आहे. या दोघांची देखभाल करणे कठीण होत आहे. 

पत्नी घरी असताना मी नोकरी करायचो, आता मुलं घेऊन कुठे कामाला जाऊ. भीक मागून जगावे लागते. जर माझी पत्नी परत आली नाही तर मी आत्महत्या करेन असं देखील वैतागलेल्या पतीने म्हटलं आहे. कृष्णा मुरारी गुप्ता आणि त्याची पत्नी कैमूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांनी 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. कृष्णा मुरारी गुप्ता हा जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे आणि त्याची पत्नी नुआव पोलीस ठाण्यातील रहिवासी आहे. कृष्णा मुरारी गुप्ता सांगतात की, लग्नाच्या एक वर्षानंतर पत्नी घरातून पळून गेली. ती मला सोडून अनेक वेळा घर सोडून गेली आहे. 

पत्नीमुळे त्रस्त झालेला पती आपल्या दोन निरागस मुलांसह या कडाक्याच्या थंडीत घरोघरी फिरत आहे. पत्नीच्या शोधासाठी रामगड पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. पत्नी हरवल्याचे पोस्टर घेऊन मुलांसह रस्त्यावर फिरत आहे. त्यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. माझी पत्नी सात महिन्यांत अनेक वेळा पळून गेली आहे. मला दोन मुलं आहेत. माझ्या घरात या मुलांना कोणी पाहणार नाही. मला भीक मागायची नाही, पण मुलांच्या भल्यासाठी हे करावे लागतेय. चांगली नोकरी सोडावी लागली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.