शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:40 IST

न्यायमूर्ती दुपल्ला रमन येत्या २ जून रोजी निवृत्त होणार आहेत. यावेळी उन्हाळी सुट्टी सुरु असणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वीच निरोप समारंभ मंगळवारी ठेवण्यात आला होता.

मध्य प्रदेशचे इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती दुपल्ला रमन यांच्या निवृत्तीनिमित्त फेअरवेलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपली पत्नी गंभीर आजारी आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी मी बदली मागितली होती. माणुसकीच्या आधारे ती दिली गेली असती, परंतू आता खूप उशीर झाला, अशा शब्दांत रमन यांनी माजी सरन्यायाधीशांवर टीका केली. यामुळे न्यायपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. 

रमन यांच्यानुसार त्यांच्याकडे बदलीसाठी पर्याय मागितले गेले होते. त्यांनी कर्नाटकचा पर्याय निवडला होता. तिथे पत्नीवर चांगले उपचार करता येतील. 'मी १ नोव्हेंबर २०२३ ला मध्य प्रदेश हायकोर्टाचे पद स्वीकारले होते. १९ जुलै २०२४ ला पत्नीवर उपचारासाठी ट्रान्सफर मिळावी म्हणून दुसऱ्यांदा अर्ज केला होता. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मानवतेच्या आधारावर आणि वैद्यकीय पार्श्वभूमीवर निर्णय घेतील असे वाटले होते. सरन्यायाधीश यावर निर्णय घेऊ शकतात, परंतू आता उशीर झाला. मला त्रास देण्यासाठी चुकीच्या हेतूने मध्य प्रदेशात बदली करण्यात आली होती. ज्यांनी हे केले त्यांचा अहंकार मी पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. हे महोदय आता निवृत्त झालेले असले तरी देव विसरणार नाही, क्षमा करणार नाही, अशा शब्दांची रमन यांनी माजी सरन्यायाधीशांवर टीका केली. 

न्यायमूर्ती दुपल्ला रमन येत्या २ जून रोजी निवृत्त होणार आहेत. यावेळी उन्हाळी सुट्टी सुरु असणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वीच निरोप समारंभ मंगळवारी ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशHigh Courtउच्च न्यायालय