हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबला
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नागपूर : माहेरून हुंडा आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न नवऱ्याने केला. मयूर श्रीवास्तव (वय ३९) असे त्याचे नाव आहे. तो उत्कर्ष निर्माण अपार्टमेंट (सदर) येथे राहातो. त्याची पत्नी प्रणाली (वय ३४) हिने सदर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, तो गेल्या अनेक दिवसांपासून तिचा हुंड्यासाठी छळ करतो. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता त्याने याच कारणावरून वाद उकरून काढला आणि पत्नीला मारहाण केली. तसेच तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रणाली हिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. सदर पोलिसांकडे तिने पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी मयूर श्रीवास्तवविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबला
नागपूर : माहेरून हुंडा आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न नवऱ्याने केला. मयूर श्रीवास्तव (वय ३९) असे त्याचे नाव आहे. तो उत्कर्ष निर्माण अपार्टमेंट (सदर) येथे राहातो. त्याची पत्नी प्रणाली (वय ३४) हिने सदर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, तो गेल्या अनेक दिवसांपासून तिचा हुंड्यासाठी छळ करतो. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता त्याने याच कारणावरून वाद उकरून काढला आणि पत्नीला मारहाण केली. तसेच तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रणाली हिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. सदर पोलिसांकडे तिने पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी मयूर श्रीवास्तवविरुद्ध गुन्हा दाखल केला. -----