शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दारूड्या पतीचा खून करून दोन दिवस मृतदेहासोबत झोपली पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 14:06 IST

दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे पतीचा मृतदेह या महिलेने दोन दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला.

ठळक मुद्देतिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. नितीश दारू पिऊन शिल्पीसोबत रोज भांडण करायचा, तिला मारहाण करायचा.  या त्रासामुळे वैतागलेल्या आरोपी शिल्पीने पतीची हत्या करण्याचा प्लॅन बनवला. मी पार्टी देते असं सांगून तिने नितीशला दारूची बाटली दिली. बरीच दारू प्यायल्यानंतर नितीश नशेत असल्याचं पाहून तिने संधी साधली.

नवी दिल्ली, दि. 27 - दिल्लीमध्ये दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे पतीचा मृतदेह या महिलेने दोन दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला. दोन दिवस याबाबत कोणालाही थांगपत्ता लागला नाही. दोन दिवसांनंतर पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं तिने शेजा-यांना सांगितलं. पण अंत्यसंस्कारावेळी एका शेजा-याला शंका आली आणि अखेऱ तिचा गुन्हा उघड झाला. चौकशीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या कापसहेडा परिसरातील ही घटना आहे. आरोपी शिल्पी अधिकारी (32) ही आपला पती नितीश याच्यासोबत येथे राहात होती. दोघं भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. शिल्पी एका बॅंकेत साफसफाईचं काम करते. तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. नितीश दारू पिऊन शिल्पीसोबत रोज भांडण करायचा, तिला मारहाण करायचा.  या त्रासामुळे वैतागलेल्या आरोपी शिल्पीने पतीची हत्या करण्याचा प्लॅन बनवला. गेल्या शनिवारी तिने संधी साधली. मी पार्टी देते असं सांगून तिने नितीशला दारूची बाटली दिली. बरीच दारू प्यायल्यानंतर नितीश नशेत असल्याचं पाहून तिने संधी साधली. त्याचा गळा दाबून शिल्पीने नितीशची हत्या केली. हत्या केल्यानंतर 48 तास तिने नितीशचा मृतदेह आपल्यासोबतच ठेवला. त्याच्या मृतदेहाच्याच बाजूला दोन दिवस तिने झोपून काढले. 

मात्र, दोन दिवसानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत तिला काही सुचत नव्हतं. तेव्हा तिने जोरजोरात रडण्याचं नाटक केलं. रडण्याचा आवाज ऐकून शेजारी तेथे पोहोचले. नितीशचा रात्रीतून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं तिने त्यांना सांगितलं. शेजा-यांना घरात काय झालं याची काही कल्पना नव्हती त्यामुळे शिल्पी खरं बोलत आहे असं मानून शेजा-यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. 

नितीशचा  मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात आणल्यानंतर मात्र शिल्पीचा गुन्हा उघडकीस आला. कारण तेथे उपस्थित एका व्यक्तीचं लक्ष नितीशच्या गळ्यावर गेलं आणि त्याला शंका आली. घटनेचं गांभीर्य ओळखून त्याने त्याचवेळी पोलिसांना माहिती दिली. अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. शवविच्छेदनातून मृत्यूचं खरं कारण समजल्यानंतर पोलिसांनी शिल्पीला अटक केली.