राजकोट : एकीकडे सुनेवर अत्याचार आणि हुंडाबळीसारख्या घटना वाढत असताना पोरबंदरचे भाजप खासदार लेऊवा पटेल समाजाचे आणि शेतकऱ्यांचे नेते विठ्ठल रादादिया यांनी सुनेचे पुन्हा लग्न लावून देतानाच तिला कन्यादानापोटी शंभर कोटी रुपयांची संपत्ती भेट देत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.रादादिया यांचे पुत्र कल्पेश यांचे सात महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कल्पेश यांच्या मागे पत्नी मनीषा आणि दोन मुले आहेत. मनीषाला नवे वैवाहिक आयुष्य जगता यावे यासाठी तिचे लग्न लावून देण्याचा विचार रादादिया यांच्या मनात घोळत होता. रादादिया यांचे दुसरे पुत्र ललित यांचा मित्र हार्दिक चोवाटिया हा मनीषासोबत विवाहाला तयार झाला. हा विवाह शुक्रवारी राजकोट जिल्ह्यातील जामकांर्डोना येथे साधेपणाने पार पडला.(वृत्तसंस्था)
खासदाराने केले विधवा सुनेचे सालंकृत कन्यादान
By admin | Updated: September 27, 2014 06:48 IST