शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलपासून इन-हँड सॅलरी घटणार; नोकरदारांनो, जाणून घ्या तुमचं आर्थिक गणित कसं बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:58 IST

वेतन संहिता येत्या एप्रिल महिन्यापासून लागू केली जाणार

४४ केंद्रीय कामगार कायद्यांपैकी केंद्र सरकारने २९ कायदे एकत्रित करून नवीन वेतन संहिता तयार केली आहे. वेतन संहिता, २०१९ (कोड ऑफ वेजेस) असे त्याचे नाव असून गेल्या वर्षी संसदेत त्यास मान्यता देण्यात आली. ही वेतन संहिता येत्या एप्रिल महिन्यापासून लागू केली जाणार आहे.सद्य:स्थिती काय?एरवी रोजगारकर्ते (एम्प्लॉयर) कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (बेसिक पे) व महागाई भत्ता यांच्या बेरजेच्या १२% रक्कम पगारातून कापून तेवढ्याच रकमेची त्यात भर घालत कर्मचाऱ्याच्या पीएफमध्ये भरतातत्यामुळे रोजगारकर्ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या पे-स्लिपमध्ये मूळ वेतनाची रक्कम कमी दाखवतात. इतर भत्त्यांची संख्या मात्र जास्त असतेअसे केल्याने रोजगारकर्त्यांना भविष्य निर्वाह निधीतला त्यांचा वाटा कमी प्रमाणात भरता येतो. ग्रॅच्युईटीही कमी भरावी लागतेसध्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार आणि इतर भत्ते याला कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) असे संबोधले जातेएप्रिलनंतर काय? नव्या वेतन संहितेमध्ये काही विशिष्ट बाबींचा समावेश करण्यात आला आहे तर काही गोष्टी बाद करण्यात आल्या आहेत पगारातील भत्त्यांचे प्रमाण एकूण वेतनाच्या ५० टक्क्यांहून अधिक असायला नको.  त्यामुळे कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या निम्मे पगार हे त्याचे मूळ वेतन असणार.  रोजगारकर्त्यांना मूळ वेतनाचे प्रमाण वाढवावे लागणार साहजिकच पीएफ आणि  ग्रॅच्युईटीतील योगदानही वाढणार  त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात येणारा पगार कमी होणारवेतनात कशाचा समावेश? मूळ वेतन, महागाई भत्ता आणि राखीव भत्ता (रिटेनिंग अलाऊन्स) हे वेतन म्हणून ग्राह्य धरले जातील.वेतनाच्या व्याख्येत पुढील गोष्टींचा समावेश नसेलसानुग्रह अनुदान, निवासासाठी दिलेले घर, वीज जोडणी, पाणी पुरवठा किंवा तत्सम इतर सुविधा.  रोजगारकर्त्यांचे भविष्य निर्वाह निधी वा इतर कोणत्याही निवृत्ती योजनेतील योगदानवाहन भत्ता. कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपावरून विशिष्ट खर्चाची भरपाई करण्यासाठी दिलेली रक्कम. घरभाडे भत्ता. जादा कामासाठीचा भत्ता. ग्रॅच्युईटीतील योगदानकर्मचाऱ्यांना भविष्यात असा होईल फायदा?सध्या हातात कमी पगार येणार असला तरी भविष्यातील आर्थिक तरतूद यामुळे होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीतील योगदान वाढून निवृत्तीनंतर भरघोस रक्कम हाती राहील.