शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार का उघडले? पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:25 IST

अलीकडेच पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला (एएसआय) रत्न भांडार उघडण्यास आणि दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची ओडिशा सरकारला शिफारस करण्याची घोषणा केली.

- अंबिका प्रसाद कानुनगो लोकमत न्यूज नेटवर्कभुवनेश्वर : भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार उघडण्यासंबंधीच्या घडामोडींवर पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शंकराचार्य म्हणाले की, व्यवस्थापकीय समिती, एसजीटीए, ओडिशा सरकार किंवा अन्य कोणीही माझे मत जाणून घेतलेले नसल्यामुळे मी या विषयावर बोलणे योग्य होणार नाही.

अलीकडेच पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला (एएसआय) रत्न भांडार उघडण्यास आणि दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची ओडिशा सरकारला शिफारस करण्याची घोषणा केली. त्यावर शंकराचार्य म्हणाले की, मला अंधारात दगड मारायचे नाहीत. मला व्यवस्थापकीय समितीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. समिती, ओडिशा सरकार आणि सेवकांना माझ्यापासून दूर राहायचे आहे. त्यामुळे सर्व बाबी जाणून घेतल्याशिवाय बोलणे योग्य नाही.

यासंबंधीच्या निर्णयानुसार, पुढील वर्षी रथयात्रेदरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी रत्न भांडार उघडण्यात येणार आहे. एएसआयने एसजेटीएच्या मुख्य प्रशासकांना पत्र लिहून रत्न भांडाराची पाहणी करावी, असे म्हटले होते. रथयात्रेच्या वेळी जगन्नाथ गुंडीचा मंदिरात नऊ दिवसांच्या मुक्कामावर असताना भांडाराची पाहणी करावी, असे यात म्हटले होते. 

आधुनिक सर्वेक्षण यंत्रणा वापरणारn समितीने पुढील रथयात्रेच्या वेळी एएसआयला रत्न भांडाराची पाहणी करण्याची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारला शिफारस पत्र पाठविण्याची सहमती दर्शविली.n एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार असून, यात व्यवस्थापकीय समिती, काही सेवक असतील व ते रत्न भांडारच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आधुनिक सर्वेक्षण यंत्रणा वापरतील.

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्रा