शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राफेलसाठी रिलायन्सला का निवडले, हे डसॉल्टलाच माहिती : सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 12:44 IST

सीतारामन आज मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडिया समिटमध्ये हे मत मांडले.

मुंबई : राफेल खरेदीप्रकरणी गैरव्यवहारांचे आरोप फेटाळताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी रिलायन्सची निवड कुणी आणि का केली हे डसॉल्ट एव्हीएशनलाच माहिती असे सांगत हात झटकले आहेत.

सीतारामन आज मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडिया समिट मध्ये हे मत मांडले. यावेळी त्यांनी राफेल विमानखरेदीवरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर उत्तर दिले. भारताला विमाने विक्री करताना कोण भागिदार निवडायचा आणि किती भागिदार निवडायचे हे डसॉल्टवरच अवलंबून आहे. करारातील हा निकष 2012 मधील मूळ निविदेमध्ये सुद्धा होता. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. 

तसेच डसॉल्टने रिलायन्सला निवडले की नाही, की फक्त रिलायन्सची निवड केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत आहे. त्यांनी अद्याप सरंक्षण मंत्रालयाला अधिकृत कळवलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

राफेलची खरेदी पूर्णपणे काँग्रेस सरकारच्या काळात निश्चित केलेल्या करारानुसारच झाली. फक्त त्यावेळच्या सरकारने 18 विमाने थेट खरेदी करण्याचे ठरवले होते. मोदी सरकारने 36 विमानांचा निर्णय घेतला. सध्या दोन तुकड्यांची तात्काळ निकड असल्याने 36 विमाने खरेदी केली जात आहेत, असेही सीतारामन यांनी म्हटले.

शस्त्रे कोणाकडून घ्यायची हे भारतच ठरविणार, अमेरिका नाहीरशिया कडून शस्त्र खरेदीबाबत अमेरिकेची कुठलीही नाराजी नाही. भारताला असलेला धोका पाहता प्रबळ संरक्षणाची गरज असल्याची भारताची भूमिका अमेरिकेला पटली आहे. शस्त्र कोणाकडून खरेदी करायची हा सर्वस्वी भारताचा निर्णय असेल, अमेरिकेने चॉईस देण्याची गरज नाही, असेही सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनfraudधोकेबाजी