शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सामन्याला परवानगी का दिली?, प्रदूषणाबाबत उपाय न योजल्याबद्दल नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:17 IST

दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले

नवी दिल्ली : दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले. इतके प्रदूषण व धुरके असताना, कोटला मैदानावर भारत-श्रीलंका कसोटी सामन्याला परवानगी का दिली, असा सवालही आयोगाने दिल्ली सरकारला केला. उपाययोजनेबाबतचा तुमचा आराखडा कुठे आहे?  तो तुम्ही आतापर्यंत सादर का केला नाही? तुम्ही तुमची भूमिका रोज बदलत राहिलात तर आयोगाने करायचे तरी काय, असा सवाल करीत आयोगाचे अध्यक्ष व माजी सरन्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी ४८ तासांमध्ये आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्याआधी आराखडा सादर करण्यासाठी आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती दिल्ली सरकारचे मुख्य सचिव व पर्यावरण सचिव यांच्यातर्फे आयोगाला करण्यात आली.हे सहन करीत राहायचे?दिल्लीतील धुरके व प्रदूषणाच्या रोजच्या रोज वर्तमानपत्रांत मोठ्या बातम्या येत आहेत, हवा अधिकाधिक वाईट होत आहे, खेळाडूंनाही तोंडाला मास्क लावण्याची वेळ आली आहे. असे असताना तुम्ही आतापर्यंत काही केले नाही, या शब्दांत नाराजी व्यक्त करीत, दिल्लीकरांनी हे सारे सहन करीतच राहावे, असे तुम्हाला वाटते की काय, असा सवालही हरित आयोगाने दिल्ली सरकारला केला.

टॅग्स :Sportsक्रीडाCricketक्रिकेट