शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही आधारची सक्ती का ?- सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: April 21, 2017 18:28 IST

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. आधार कार्ड हे पर्यायी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा आदेश दिला असतानाच केंद्र सरकारनं तो सक्तीचा का केला, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्ड सक्तीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. आधार कार्डला आम्ही पर्यायी पुरावा म्हणून मान्यता दिली असतानाच तुम्ही आधार कार्ड सक्तीचं कसे करू शकता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला आहे. त्यानंतर अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरकारकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. रोहतगी म्हणाले, बनावट कंपन्यांचा निधी हस्तांतर करण्यासाठी पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. हे प्रकार रोखण्यासाठी आधार कार्डला अनिवार्य करणे हा एकमात्र पर्याय आमच्याकडे शिल्लक राहिला आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं प्राप्तिकर परतावा, पॅन कार्डच्या अर्जासाठी आधार कार्ड सक्तीचं केलं होतं. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. बनावट पॅनकार्डच्या वापर रोखण्यासाठी पॅन कार्डसोबत आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे, असंही जेटली म्हणाले होते. तत्पूर्वी 11 ऑगस्ट 2015ला सर्वोच्च न्यायालयानं सरकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही, असा निर्णय दिला होता. नागरिकांना मिळणा-या कोणत्याही सुविधेसाठी आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही, हे केंद्रानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगावं, असंही सर्वोच्च न्यायालय सुनावणीत म्हणाले होते. तत्पूर्वी कर परतावा भरताना नावातील पहिल्या अक्षरामुळे अनेकांना अडचणी येत होत्या. के. व्यंकटेश यांनाही त्यांच्या नावातील "के" या अक्षरामुळे कर परतावा भरताना समस्या निर्माण झाली होती, कारण त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जुळत नाही. बँकेत काम करणा-या के. व्यंकटेश यांनी आपल्या अकाऊन्टंटला संपर्क साधल्यानंतर त्यांचा हा प्रकार उघडकीस आला होता.