शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:02 IST

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. - चौधरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रापासून ते चित्त्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर बोलतात, पण ते मणिपूरवर बोलत नाही. त्यांनी मणिपूरप्रश्नी ‘मन की बात’ करायला हवी होती, असे मत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.

चौधरी म्हणाले, आम्हाला प्रश्न पडला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत का येत नाही, मणिपूरप्रश्नी ते बोलत का नाही, त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. त्यांनी किमान एकदा तरी मणिपूरबाबत ‘मन की बात’ केली असती, तर काय बिघडले असते? त्यांना सर्व प्रश्नांवर बोलायला वेळ आहे, चंद्रापासून ते कुनोतील चित्त्यांवर बोलायला वेळ आहे, पण मणिपूरविषयी ते गप्प राहतात.

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्हाला देशाच्या जनतेशी देणे-घेणे आहे. आम्ही मणिपूरची अवस्था पाहिली, गंभीर परिस्थिती तिथे आहे. पण देशाचे नेतृत्व म्हणून तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी किमान दोन शब्द बोलायला हवे होते.     अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे नेते 

विरोधकांचा सभात्यागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात अनेक वेळ मणिपूरवर वक्तव्य न केल्याने विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.

तुम्ही स्वप्ने दाखवता, आम्ही साकार करतो - निर्मला 

संपुआ सरकारच्या काळात सर्वसामान्य व गरिबांना अनेक मूलभूत गरजांची पूर्तता होणार म्हणून स्वप्ने दाखवली जायची. गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांची ही स्वप्ने साकार केली, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. २०१४ आणि २०१९ मध्ये जनतेने संपुआवर जो अविश्वास दाखवला त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला सीतारामन यांनी लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षांना लगावला.

सध्या दोनशे रुपये किलो दराने विकले जात असलेल्या टोमॅटोचे दर दिल्लीत लवकरच ७० रुपये प्रतिकिलो होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून खरेदी करून टोमॅटो दिल्लीत ७० रुपये दराने उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी, २०१३ला जगातील पाच सर्वांत नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होता. तिथून नऊ वर्षांत कोरोनापश्चातही भारताची अर्थव्यवस्था सुधारून आज जगातील सर्वांत वेगवान वाढ नोंदविणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था२०२३-२४ मध्ये ६.५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणाकेल्यामुळे शक्य झाले.         - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री  

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन