शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

...म्हणून हत्तिणीनं 'ते' फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं असावं, पर्यावरण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:03 IST

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपा खासदार मनेका गांधी यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता.

तिरुअनंतपूरमः गेल्या आठवड्यात केरळमधील मलप्पूरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं. अननस खाल्ल्यानंतर हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपा खासदार मनेका गांधी यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानंही या प्रकरणात खुलासा केला आहे. त्या हत्तिणीच्या मृत्यूची प्राथमिक चौकशी केली असता फटाके भरलेलं अननस हत्तिणीला खाऊ घालण्यात आलेलं नाही, तर तिनं चुकीनं ते खाल्लं असावं, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे. घटनेची चौकशी करण्यात आली असून, त्यात हत्तिणीनं फटक्यांनी भरलेलं अननस चुकून खाल्लं असावं, असं प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं आहे. पर्यावरण मंत्रालय केरळ सरकारच्या संपर्कात असून, आरोपींना अटक करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हत्तिणीचा मृत्यू झाला, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत,” असं पर्यावरण मंत्रालयानं म्हटलं आहे.

हत्तिणीच्या शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूच्या १४ दिवस आधी हत्तिणीने काहीही खाल्ले नव्हते. अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागत होता. त्याचप्रमाणे तिच्या मृत्यूचे मुख्य कारण फुफ्फुसातील पाणी जाणे हे देखील असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसात पाणी शिरल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात रानावनात फिरत होती. या हत्तिणीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिल्याचं सांगितलं जात आहे. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.

हेही वाचा

लॉकडाऊनचा परिणाम! नोकरी गमावली; डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकतोय केळी

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ

टॅग्स :Keralaकेरळ