शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्टरलाइटच्या विरोधकांवर गोळीबार का केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:06 IST

सरकारने हा खुलासा ६ जूनपर्यंत सादर करायचा आहे.

चेन्नई : तुतुकोडी येथील स्टरलाइटच्या कॉपर स्मेलर प्लांटविरोधात २२ मे रोजी जोरदार निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांनीका गोळीबार केला, याचे स्पष्टिकरण मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तामिळनाडू सरकारकडे मागविले आहे. त्या गोळीबारात  १३ ठार व १०२ जण जखमी झाले होते.सरकारने हा खुलासा ६ जूनपर्यंत सादर करायचा आहे. या कॉपर स्मेलर प्लांटमुळे भूजलसाठे प्रदूषित होत असून पर्यावरणासाठी तो प्रकल्प घातक असल्याचा आक्षेप तुतुकुडीतील रहिवाशांनी घेतला होता व ते प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले होते. स्टरलाइट गोळीबारप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालक टी. के. राजेंद्रन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, तसेच या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशा विनंतीची याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. तिच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. गोळीबाराच्या घटनेची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन आठवड्यांत सादर करावा असा आदेश आयोगाने तामिळनाडूचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना दिला होता. स्टरलाइटच्या मुद्द्यावरून तापलेल्या वातावरणाचे चटके बसू लागताच, तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांनी परीक्षण करुन हा कॉपर स्मेलर प्लांट कायमचा बंद करण्याचा अहवाल दिला. त्यानुसार तामिळनाडू सरकारने तात्काळ कारवाई केली.पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेल्यांपैैकी तिघांचे मृतदेह हा प्लांट पूर्ण बंद होईपर्यंत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यातील कलियप्पन यांचा मृतदेह कुटुंबीयांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतला. गोळीबार घटनेतील पुरावे नष्ट करण्यात येत आहेत, अशी शंका व्यक्त करणारी एक याचिकाही मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्या अनुषंगाने कलियप्पनसह सात जणांच्या मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच सरकारला दिले होते.