शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

केरळ राज्यपालपदी आरिफ खान यांना का निवडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 09:12 IST

मंत्रिमंडळातही हवा प्रतिनिधी; सक्षम, बुद्धिमान नेत्याचा शोध सुरू

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : केरळच्या राज्यपालपदी आरिफ मोहम्मद खान यांना नियुक्त करून नरेंद्र मोदी सरकार या महत्वाच्या राज्यात आपला विस्तार करू इच्छिते याचे संकेत मिळतात. गेल्या आठवड्यात सरकारने खान यांच्यासह पाच राज्यपालांची नियुक्ती केली. जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक हे कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देऊ शकतात तशा भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरिफ मोहम्मद खान यांची निवड केली आहे.

खान हे मूळात काँग्रेसमध्ये होते नंतर ते जनता दलात गेले. तेथून बीकेएस मग बहुजन समाज पक्ष आणि शेवटी २००२ मध्ये भाजपत स्थिरावले. खान यांनी भाजपचाही निरोप घेतला तरी ते बऱ्याच काळापासून मोठ्या राजकीय भूमिकेच्या शोधात होते. अशीच परिस्थिती सत्यपाल मलिक यांची होती. काश्मीरसारख्या मुस्लिम बहुसंख्येच्या राज्यात मोदी यांना राजकीय नेता हवा होता तेव्हा त्यांनी मलिक यांना निवडले.गेल्या काही काळापासून मोदी यांनी केरळवर लक्ष केंद्रीय केले आहे. उदा. मोदी यांनी ए. पी. अब्दुलकुट्टी यांना भाजपत सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. अब्दुलकुट्टी हे प्रमुख मुस्लिम नेते असून गुजरातमधील विकासाच्या मॉडेलची प्रशंसा केल्याबद्दल माकपमधून त्यांना काढून टाकले गेले. मग ते काँग्रेसमध्ये गेले. मोदींची त्यांनी तेथेही प्रशंसा केली म्हणून काँग्रेसने त्यांना निरोप दिला.भाजपमध्ये जाण्याची अब्दुलकुट्टी यांची बाह्यत: इच्छा नव्हती. परंतु, मोदी यांच्या आग्रहास्तव ते भाजपत आले.तलाकबंदी कायद्याला ठाम पाठिंबा

खान यांनी राजकीय पक्ष बदलले; परंतु, तिहेरी तलाक बंदी कायद्याला त्यांनी जो ठामपणे पाठिंबा दिला त्यावर कधी त्यांनी तडजोड केली नाही. एवढेच काय त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमधून राजीनामाही दिला होता.मोदी यांनी खान यांच्यात धैर्य, संयम पाहिला आणि त्यांना संधी दिली. खान हे राज्यसभेत संधी मिळते ते बघत होते. परंतु, मोदी यांची नजर आता केरळवर असल्यामुळे खान यांना त्यांनी तेथे राज्यपाल म्हणून पाठवले. खान हे हाडाचे राजकीय नेते असून ते सक्रिय भूमिका बजावू शकतात.

 

टॅग्स :KeralaकेरळPresidentराष्ट्राध्यक्षtriple talaqतिहेरी तलाक